Ind vs End-विराट कोहली स्वार्थी तर नाही ना?

भारत- इंग्लंडमध्ये दुसरी कसोटी लॉर्डस् वर खेळली जात आहे. पहिल्या डावात भारताला फक्त १७० धावांची मजल मारता आली. पहिल्या सामन्यात शिखर धवनच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. त्याच्याऐवजी चेतेश्वर पुजाराला संधी दिली गेली. पुजाराकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र कर्णधार विराट कोहलीच्या चुकीच्या निर्णयामुळे पुजारा फक्त एक धाव काढून बाद झाला.

आत्तपर्यंत विराट पाचवेळा खेळाडूंच्या धावबादाचे कारण झाला आहे. या पाचपैकी चारवेळा दुसरे खेळाडू तर एकदा स्वतः विराट धावबाद झाला आहे.

Trending Now