अर्जुन तेंडुलकरने घेतली विकेट, व्हिडिओ पाहून भावूक झाला विनोद कांबळी

अर्जुनने घेतलेला कमीलच्या बळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई, 18 जुलैः अर्जुन तेंडुलकरने त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला पहिला बळी श्रीलंकेविरुद्धात घेतला. सध्या अर्जुन भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. अर्जुनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेच्या कामिल मिशाराला पायचीत केले. सध्या अर्जुनने घेतलेला कमीलच्या बळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अर्जुनचे सर्व स्थरांवरून कौतुक होत असताना सचिन तेंडुलकरचा जवळचा मित्र विनोद कांबळीने अर्जुनसाठी एक भावनीक ट्विटही केले आहे. विनोदने लिहिले की, जेव्हा मी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी त्याला लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. त्याने किती मेहनत घेतली आहे हे मी स्वतः पाहिले आहे. आज मी तुझ्यासाठी फार आनंदी आहे. अर्जुन ही फक्त तुझी सुरूवात आहे. तुला अजून खूप पुढे जायचं आहे. खूप यश संपादन करायचं आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तुझ्या पहिल्या बळीचा आनंद एन्जॉय कर.हेही वाचाःछगन भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस निरीक्षक निलंबितअजब मनपाचा गजब दावा, प्लास्टिक बंदीमुळे मुंबईत कमी पाणी तुंबलंभाजपविरोधात आंदोलनामुळे मनसे कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

Trending Now