FIFA world Cup 2018 : आज एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती

नव्या जोमाने विश्वचषकातील पहिला विजय मिळवण्यासाठी ब्राझीलचे खेळाडू सज्ज झाले आहेत. कोस्टारिकाला मात्र या सामन्यात सर्वस्व पणाला लावावे लागेल, अन्यथा त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.

Sonali Deshpande
रशिया, 22 जून : FIFA वर्ल्डकप प्रेमीसाठी आज एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती असणार आहेत.पहिला सामना संध्याकाळी 5.30 वाजता - कोस्टारिका विरुद्ध ब्राझीलदुसरा सामना रात्री 8.30 वाजता - आइसलंड विरुद्ध नायजेरिया

दुखापतीमुळे मंगळवारी सराव सत्रातून माघार घेणारा नेमार पूर्णपणे सावरलाय. त्यामुळे आज होणाऱ्या कोस्टारिका विरुद्धच्या सामन्यापूर्वी ब्राझीलच्या संघात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. त्यामुळेच नव्या जोमाने विश्वचषकातील पहिला विजय मिळवण्यासाठी ब्राझीलचे खेळाडू सज्ज झाले आहेत. कोस्टारिकाला मात्र या सामन्यात सर्वस्व पणाला लावावे लागेल, अन्यथा त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.हेही वाचामुंबईत रिक्षा,टॅक्सी भाडेवाढ होण्याची शक्यतादुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात शिवनेरी बस दुभाजकाला धडकून झाली पलटी !

आता नवाजुद्दीन आपल्या बायकोला अजिबात घाबरत नाही!

अर्जेंटिनाला बरोबरीत रोखणाऱ्या आइसलंड संघासमवेत आज नायजेरियाचा सामना रंगणार आहे. नायजेरिया पहिल्याच सामन्यात २-० असा पराभूत झालेला असल्याने त्यांच्यासाठी हा सामना आव्हान टिकवून ठेवण्याची अखेरची संधी आहे. प्रशिक्षक गेरनॉट रोहरच्या मार्गदर्शनाखाली नायजेरियाचा संघ चांगल्या तयारीत आहे. मात्र पहिल्या सामन्यातील पराभवामुळे त्यांना या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक असल्याने त्या दबावात त्यांना खेळावे लागणार आहे.

Trending Now