या पाचजणांमुळे लॉर्ड्समध्ये हरला ‘विराट’ संघ

लॉर्ड्समध्ये खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या सामन्यात भारताने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. इंग्लंडने भारतीय संघाला एक डाव राखून १५९ धावांनी हरवले. भारताच्या या पराभवाला पाच खेळाडू जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या या पराभवाचं पहिलं कारण म्हणजे सलामीवीर मुरली विजयची खराब खेळी. विजयने या सामन्यात धावांचा श्रीगणेशाही केला नाही. दोन्ही डावांमध्ये तो शुन्यावर बाद झाला. शिखर धवनऐवजी आलेला फलंदाज केएल राहूल देखील काही खास कामगिरी करु शकला नाही. राहूलने पहिल्या डावात ८ आणि दुसऱ्यामध्ये फक्त १० धावा केल्या.

भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची फलंदाजीनेही निराशाच केली. रहाणेने दोन्ही डावात १८ आणि १३ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीला लॉर्ड्सच्या मैदानावर काही खास खेळी करता आली नाही. पहिल्या कसोटीत शतक ठोकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विराटने २३ आणि १७ म्हणजे एकूण ४० धावांपर्यंतच मजल मारता आली.

Trending Now