इंग्लंडने 24 तास अगोदर जाहिर केला आपला संघ

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 5 मॅचेसची टेस्ट सीरीज उद्यापासून एजबेस्टन येथे सुरू होतेय.

दिल्ली, ता. 31 जुलै : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 5 मॅचेसची टेस्ट सीरीज उद्यापासून एजबेस्टन येथे सुरू होतेय. त्यासाठी इंग्लंडने 24 तास अगोदर आपला संघ जहिर केलाय. 2014 मध्ये टीम इंडियाला भारी पडलेला ऑफ स्पिनर मोइन अली याला मात्र इंग्लंडने या संघात स्थान देण्यात आलेले नाही.इंग्लंडच्या या प्लेईंग इलेवन संघात जो रूट, एलिस्टर कुक, कीटॉन जेनिंग्स, डेविड मलान यांना खेळण्याची संधी मिळीली आहे. तसेच सद्या फॉर्मात असलेले बॅट्समन जॉनी बेयरस्टो आणि जो बटलर हे देखील या संघात आहेत. इंग्लंडने या संघात डावखुऱ्या जलद बॉलर सैम कर्रनला सुद्धा घेतले आहे. याशिवाय क्रिस ब्रॉड आणि जेम्स एंडरसन हे देखील या टिममध्ये आहेत. ऑलराउंडर बेन स्टोक्स सुद्धा या प्लेईंग इलेवन असून, आदिल रशीद याला स्पिनर म्हणून घेण्यात आले आहे.कमालच झाली!,आरटीओने दिलं मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर चालवण्याचं लायसन्स

2014 मध्ये ऑफ स्पिनर मोइन अली टीम इंडियाला भारी पडला होता. त्यावेळेस त्याने टीम इंडिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या टेस्ट सीरीज मध्ये 19 विकेट घेतल्या होत्या. त्याला इंग्लंडच्या संघात स्थान मिळाले नसल्याची बाब ही विराट कोहलीसाठी चांगली नाही. इंग्लंडच्या संघात एकच स्पिनर असणे म्हणजे, एजबेस्टनची पिच ही स्पिन फ्रेंडली नसणार, आणि त्यामुळे येणारे बॉल उसळण्याची आणि स्विंग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 5 मॅचेसची टेस्ट सीरीज उद्यापासून एजबेस्टन येथे सुरू होतेय. त्यासाठी टीम इंडियाही सज्ज झाली असून, उद्या १ ऑगस्टपासून  क्रिकेटचे हे घमासान सरू होणार असून ते पाच दिवस चालणार आहे.हेही वाचा..VIDEO : रेल्वे येत असल्याची पाहून 'तो' रूळावर जाऊन झोपला...चाकणच्या हिंसेत पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण, प्रकृती धोक्याबाहेरसुरू झालंय 'मंगळ' दर्शन, मुकला तर 2035 पर्यंत पाहावी लागेल वाट !

Trending Now