धोनीच्या या पाच निर्णयांनी साऱ्यांनाच केले होतं थक्क

धोनीने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये तोंडात भोट घालायला लावतील असे निर्णय घेतले आहेत. त्याच्या याच निर्णयांमुळे तो आज भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. नवख्या टीमसोबत जिंकला टी-20 वर्ल्ड कप-
2007 टी- 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने धुरा सांभाळली होती. धोनीच्या या टीममध्ये युवा खेळाडूंचा भरणा होता. याच सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याने अष्टपैलू खेळाडू जोगिंदर शर्माला गोलंदाजी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. पण त्याचा हा निर्णय किती योग्य होता ते शेवटी अख्या जगाला कळलेच. संपूर्ण टीमसोबत पत्रकार परिषदेला हजेरी-
2009 मध्ये झालेल्या दुसऱ्या टी- 20 वर्ल्ड कपच्या पत्रकार परिषदेत धोनी संपूर्ण टीमसोबत पोहोचला होता. धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात विस्तवही जात नाही असे म्हटले जात होते. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे दाखवण्यासाठीच धोनी संपूर्ण टीमसोबत पत्रकार परिषदेला हजर राहिला होता.

ऑस्ट्रेलियात असताना कसोटी क्रिकेटमधून संन्यास-
कसोटी क्रिकेटमधून ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळत असतानाच कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय तडका फडकी घेतला. त्याच्या या निर्णयाने क्रिकेट विश्वात खळबळ माजली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला होता. योग्य वेळी कर्णधारपद सोडणे
एक यशस्वी कर्णधार असतानाच महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. धोनीने एकदिवसीय आणि टी- 20 क्रिकेटच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. धोनी भारताचा असा कर्णधार आहे ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि संघाला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. 4 जानेवारी 2017 मध्ये धोनीने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला.

Trending Now