खेळाप्रमाणेच कमाईमध्येही पी.व्ही. सिंधू अव्वल, जगात सर्वात श्रीमंत महिलांमध्ये चक्क या स्थानावर

सध्या बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच खेळाडूंचेदेखील स्टारडम वाढले आहे. आता पीव्ही सिंधूचंच बोलायचं झालं तर, तिच्या रोमांचक खेळाचे चाहते आता फक्त देशातच नाही तर जगभर पसरले आहेत. भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधुने २०१६ च्या रियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक पटकावलं. इतक्या मोठ्या स्टार खेळाडूची महिन्याची कमाई नेमकी किती असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, चला तर मग जाणून घेऊयात. रिओ ऑलिम्पिकनंतर सिंधूला अनेक जाहिरातींच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडरसाठीऑफर्स आल्या. आता फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वाधिक श्रीमंत महिला खेळाडूंच्या यादीत ती ७ व्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. जून २०१७ ते जून २०१८ या कालावधीत तिने तब्बल ८५ लाख डॉलर कमवले आहेत. तिने खेळांमध्ये जिंकलेली रक्कम आणि जाहिरातींमधून मिळालेली रक्कम मिळवून तिची वर्षाची कमाई जवळपास ८५ लाख डॉलर एवढी आहे.

सिंधू ऑलम्पिकनंतर स्टार खेळाडू झाली. ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या उत्कृष्ट खेळामुळे तिला वेगवेळ्या राज्यांमधून एकूण १३ कोटीचे मानधन मिळाले. फोर्ब्सच्या या यादीत सेरेना विलियम्स प्रथन क्रमांकावर आहे. त्यानंतर कैरोलिना, स्लोन स्टीफंस, गारबाइन मुगुरूजा, मारिया शारापोवा आणि वीनस विलियम्स यांचा नंबर लागतो.

Trending Now