मराठी बातम्या / बातम्या / स्पोर्ट्स / 'वर्ल्ड कप जिंकायला आलो होतो, जिंकला', शफाली वर्माला अश्रू अनावर

'वर्ल्ड कप जिंकायला आलो होतो, जिंकला', शफाली वर्माला अश्रू अनावर

पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अंडर १९ महिला संघाची कर्णधार शफाली वर्मा भावुक झाली होती. सामन्यानंतर बोलत असताना तिला अश्रू अनावर झाले.

पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अंडर १९ महिला संघाची कर्णधार शफाली वर्मा भावुक झाली होती. सामन्यानंतर बोलत असताना तिला अश्रू अनावर झाले.


मुंबई, 30 जानेवारी : शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर१९ महिला संघाने पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला. भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 विकेटने पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी 68 धावात रोखलं. त्यानंतर फलंदाजी करताना भारताने हे आव्हान 3 विकेटच्या मोबदल्यात 14 षटकात पार केलं. पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अंडर 19 महिला संघाची कर्णधार शफाली वर्मा भावुक झाली होती. सामन्यानंतर बोलत असताना तिला अश्रू अनावर झाले.

आयसीसीने शफालीचा व्हिडीओ शेअर केला आहे. भारताची कर्णधार शफालीला ऐतिहासिक विजय मिळवला आहात, हे एक मोठं यश आहे असं विचारण्यात येत असतानाच तिच्या डोळ्यात पाणी आलं. यावेळी संघातील सहकारी खेळाडूंनी उभा राहून टाळ्या वाजवल्या आणि तिला प्रोत्साहन दिलं.

emotional shafali Verma after winning the final #U19T20WorldCup #indvseng pic.twitter.com/U8G7K1U43j

— sameer khan⁴⁵ (@Mohamma79230816) January 29, 2023

हेही वाचा : IND Vs NZ : सूर्यकुमारसाठी वॉशिंग्टन धावबाद झाला, पण त्याच्यावर सूर्या संतापला; VIDEO

शफालीने सामन्यानंतर म्हटलं की, आम्ही वर्ल्ड कप जिंकायला आलो होतो आणि तो जिंकला. मुली ज्या पद्धतीने कामगिरी करत आहेत आणि एकमेकींना पाठिंबा देतायत त्याचा खूप आनंद आहे. सध्याच्या भावना शब्दा सांगता येणार नाहीत. स्टाफने ज्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट केला त्यासाठी आभार. खेळाडू मला खूप सपोर्ट करतात. मला हा सुंदर संघ दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार.

वर्ल्ड कपमध्ये शफालीने 7 सामन्यात 172 धावा केल्या. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. तिने 78 धावा काढत टी20 मध्ये तिची सर्वोच्च कामगिरी नोंदवली. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडुंमध्ये ती तिसऱ्या स्थानी आहे.

First published: January 30, 2023, 08:44 IST

Tags:Cricket

ताज्या बातम्या