या क्रिकेटरने सानिया मिर्झाची काढली छेड, होऊ शकते आजीवन बंदी

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची बांग्लादेशमध्ये छेड काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रयत्न बांग्लादेशच्या क्रिकेटरने केला आहे. स्वतः शोएब मलिकने याबाबतीत खुलासा केला. शोएबच्या मते, तो क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी ढाका येथे गेला होता. यावेळी बांग्लादेशचा स्टार फलंदाज शब्बीर रहमानने शोएबच्या पत्नीसोबत म्हणजेच सानिया मिर्झासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. शोएबने याप्रकरणाची तक्रार क्रिकेट कमिटी ऑफ ढाका मेट्रोपोलिसकडे (सीसीडीएम) केली आहे. सानिया मिर्झा मैदानात असताना तिच्यासोबत शब्बीरने असभ्य वर्तन केलं. सानिया शोएब मलिकसोबत बांग्लादेशमध्ये क्रिकेटचा सामना पाहायला गेली होती तेव्हा शब्बीबरने तिच्यासोबत गैरवर्तन केले.

शब्बीरकडे पहिल्यापासूनच वादात अडकणारा क्रिकेटर म्हणून पाहिले जाते. मैदानात असो किंवा मैदाना बाहेर तो नेहमीच वादात अडकलेला असतो. शब्बीरने मैदानात अशी अनेक कामं केली आहेत ज्यामुळे त्याला अनेकदा शिक्षाही भोगावी लागली आहे. काही दिवसांपूर्वी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सोशल मीडियावर चाहत्यांना धमकावल्याप्रकरणी आणि त्यांच्यासोबत अभद्र भाषा वापरल्या प्रकरणी शब्बीर रहमानला ६ महिन्यांची बंदी घातली होती. त्याला आशिया कपमध्येही जागा देण्यात आलेली नाही. आता सानिया मिर्झाची छेड काढल्याप्रकरणी शब्बीरवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. शब्बीरने एका सामन्यादरम्यान क्रिकेट चाहत्यासोबत मारामारीही केली होती. राजशाही डिविजनल नॅशनल क्रिकेट लीग सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक चाहता शब्बीरला पाहून जोर जोरात ओरडायला लागला. शब्बीरने सामन्यादरम्यान पंचांकडून मैदानाबाहेर जाण्याची परवानगी मागितली. त्यानंतर त्या चाहत्याला मारण्यासाठी शब्बीर साइट स्क्रीनच्या मागे गेला. ही घटना रिझर्व्ह अंपायसमोर झाल्यामुळे याची तक्रार रेफरीकडे करण्यात आली.

Trending Now