एकदिवसीय सामन्यातील दोन नव्या चेंडुंच्या वापराला सचिन तेंडुलकरचा जोरदार विरोध

भारताचा माजी फलंदाज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यातील दोन नव्या चेंडुंच्या वापराला जोरदार विरोध दर्शविलाय.

Renuka Dhaybar
मुंबई, 23 जून : भारताचा माजी फलंदाज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यातील दोन नव्या चेंडुंच्या वापराला जोरदार विरोध दर्शविलाय. हा निर्णय म्हणजे खेळाचा बट्याबोळ होण्यास आमंत्रण देणारा आहे, असे मत त्याने व्यक्त केलंय.एकाच डावात दोन नवीन चेंडू वापरले तर चेंडू जुना होणार नाही. त्यामुळे क्रिकेटमधून रिव्हर्स स्विंग नावाचे अस्त्र लुप्त होईल. शेवटच्या षटकांमध्ये गोलदाजांकडून वापरले जाणारे हे अस्त्र क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे, असं सचिन तेंडुलकरने म्हटलंय. याच संदर्भात नाराजी व्यक्त करत सचिनने ट्विटही केलं आहे. त्याच्या या विरोधाला अनेक क्रिकेटपट्टूनी पाठिंबा दिला आहे.

दरम्यान पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज वकार युनूसनेही सचिनच्या या मताचे समर्थन केलं आहे. याच कारणामुळे आता क्रिकेटमध्ये नवीन जलदगती गोलंदाज तयार होत नाहीत. सचिनच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे, असे वकारने सांगितलं आहे.

हेही वाचा...

दहशतवादी दगडांऐवजी फेकतायत शक्तीशाली ग्रेनेड, सुरक्षादलंही वैतागली

रोजगारासाठी पंजाबहून गाठलं अमेरिका, आणि आता आहे जेलमध्ये !

VIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नका!, एक ह्रदयस्पर्शी निरोप सोहळा

VIDEO : शेजाऱ्याच्या घरात चुकून घुसला,जमावाने बेदम चोपला

Trending Now