रॉजरचा त्या क्रिकेट शॉटचा सचिन झाला दिवाना, दिला मोलाचा सल्ला

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आता जगज्ज्येत्या टेनिसपटू रॉजरर फेडररला क्रिकेटचे धडे देणार आहेत. स्वतः सचिन टेनिस खेळाचा फार मोठा चाहता आहे. विंबल्डनच्या चौथ्या फेरीत रॉजर फ्रान्सच्या एड्रियान मेनारिनोविरोधात खेळत होता. या सामन्यात रॉजररने चक्क फॉरवर्ड डिफेन्स शॉट लगावला. त्याचा हा शॉट पाहून सचिनने ट्विटरवर रॉजरला म्हटले की, तू नववं विंबल्डन जिंकल्यावर क्रिकेटचे धडे घ्यायला सुरूवात कर. आतापर्यंत फेडररने आठ वेळा विंबल्डन स्पर्धा जिंकली आहे

त्याच्या या ट्विटचे उत्तर देताना, फेडरर म्हणाला की, विंबल्डन संपेपर्यंत थांबण्याची काही गरज नाही. मी आतापासूनच शिकायला सुरूवात करु शकतो. त्यामुळे विंबल्डननंतर जर तुम्हाला सचिन फेडररला क्रिकेट शिकवताना दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Trending Now