फुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात मैदानात घुसलेल्या महिलांना मिळाली ही शिक्षा

फीफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यादरम्यान मैदानात घुसणाऱ्या चार महिलांना अटक करण्यात आली असून त्यांना 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. या चार महिला एकाच संघटनेच्या होत्या. त्यामुळे त्या संघटनेविरोधातही कार्यवाई करण्यात आली. संघटनेला पुढील तीन वर्ष एकाही स्टेडिअममध्ये जाऊन मॅच पाहता येणार नाही. संघटनेवर नियमांचे उल्लंघन केल्याचा तसेच पोलिसांचा गणवेशाचा गैर वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यादरम्यान रविवारी झालेल्या झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अचानक काही महिला आणि पुरूष मैदानात धावत गेल्या. त्यांच्या या कृत्यामुळे सामना काहीवेळासाठी थांबवण्यात आला होता. यानंतर रुसमधील एका संघटनेने या कृत्याची जबाबदारी घेतली. या प्रदर्शनाला संघटनेने पोलिसमॅन एण्टर द गेम असे नाव दिले होते. 2011 पासून ही संघटना सक्रीय आहे. ही संघटना राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात अधिक प्रदर्शनं करताना दिसतात.

Trending Now