INDvsEND: गुरुद्वारात झोपायचा तर लंगरमध्ये जेवायचा हा खेळाडू, आता विराटने दिली मोठी संधी

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विराटने एक मोठा निर्णय घेतला आहे. अनुभवी खेळाडू इंग्लंडच्या मैदानावर अपयशी ठरत असताना आता विराटने नवख्या खेळाडूवर विश्वास ठेवला आहे. तिसऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतची वर्णी लागली आहे. ऋषभचा हा पहिला कसोटी सामना आहे. सर्व खेळाडूंच्या उपस्थितीत कर्णधार कोहलीने ऋषभला भारतीय संघाची टोपी दिली. ऋषभ पंतला आज संपूर्ण जग ओळखतं. पण या युवा खेळाडूचे स्ट्रगल वाचल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. (छाया सौजन्यः आयपीएल क्रिकेट)

एक हरहुन्नरी फलंदाज होण्यासाठी ऋषभने स्वतःवर घेतलेली मेहनत अवर्णनीय आहे. पंतने क्रिकेट खेळायला जेव्हा सुरूवात केली तेव्हा तो दिल्लीतील गुरूद्वाऱ्यात झोपायचा आणि जेवणाची सोय म्हणून तिथेच लंगरही खायचा. ऋषभने दिल्लीच्या सोनेट क्लबमधून क्रिकेटचे धडे गिरवले. या क्लबचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी क्रिकेटचा एक कॅम्प ठेवला होता. या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी ऋषभ रुडकी येथून यायचा. सोनेट क्लबमध्ये दर शनिवार - रविवारी ट्रेनिंग असायची. या ट्रेनिंगसाठी तो मोतीबाग गुरूद्वारात थांबायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी लंगरमध्ये काही खाल्यानंतर ऋषभ क्लबमध्ये जायचा आणि रविवारी ट्रेनिंग संपल्यावर रुडकी येथील घरी जायचा. अनेक वर्ष गुरुद्वारामध्ये राहिल्यानंतर ऋषभच्या घरातल्यांनी दिल्ली येथील छतरपुरमध्ये एक घर भाड्याने घेतले. पंतने 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट टीमपासूनतच आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. अण्डर 19 वर्ल्डकपमध्ये नेपाळ टीमविरुद्धात 18 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. तसेच पंतने नामीबियाविरुद्ध शतक ठोकत भारताला उपांत्य फेरीपर्यंत नेले होते. त्याचदिवशी दिल्ली डेअरडेविल्सने ऋषभला 1.9 कोटी देऊन आपल्या संघात घेतले होते. यानंतर ऋषभने 13 ऑक्टोबर 2016 मध्ये चौथ्या रणजी सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध 308 धावांची खेळी केली होती. ऋषभने या सामन्यात 9 षटकार आणि 42 चौकार लगावले होते. या खेळीनंतर त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. आज ऋषभ पंत आयपीएलचा एक स्टार खेळाडू आहे. (छाया सौजन्यः आयपीएल क्रिकेट)

Trending Now