सचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी!

ऋषभने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात असा करिश्मा केला आहे जे आत्तापर्यंत कुठलाच भारतीय क्रिकेटर करु शकलेला नाही. ऋषभने त्याच्या कसोटी क्रिकेटची सुरुवात एका शानदार षटकारासह केली आहे. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
टेस्ट मॅचच्या ओपनिंगलाच पंतने विक्रम करून सचिन आणि विराटनेही जे केलं नाही ती कामगिरी केली.

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या तीसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ऋषभ पंत हा २९१ भारतीय या क्रमवारीत ऋषभ भारताचा पहिला आणि जगातला १२ खेळाडू बनला आहे. 

Trending Now