... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल

लॉर्ड्समध्ये इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाचा एक डाव राखून १५९ धावांमध्ये पराभव केला. या लाजिरवाण्या पराभवानंतर पाच कसोटी सामन्यात इंग्लंडकडे २-० अशी आघाडी आहे. संपूर्ण कसोटीच इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे नतमस्तक झाले. पहिल्या डावात भारतीय संघाचा १०७ धावांमध्ये गाशा गुंडाळला गेला तर दुसऱ्या डावात भारत जेमतेम १३० धावाच करु शकला. भारतीय संघाचे असे प्रदर्शन पाहून क्रिकेटचे चाहते मात्र भलतेच नाराज झाले आहेत. या अपयशाचे खापर भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर फोडले जात आहे. सोशल मीडियावर शास्त्रींच्या विरोधात नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

ट्विटरकर शास्त्री यांना या पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक राहूल द्रविडला त्याजागी नेमावे अशी मागणी जोर धरत आहे. काहींच्या मते, भारताचा पूर्व प्रशिक्षक अनिल कुंबळेचीच पुन्हा नेमणूक व्हाही या मतावर ते ठाम आहेत.

Trending Now