IPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात रणवीरचा परफाॅर्मन्स

आयपीएलच्या या 15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी रणवीर घेत असलेलं मानधन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. रणवीर या परफॉर्मन्ससाठी 5 कोटी रुपये मानधन घेणारे.

Sonali Deshpande
27 मार्च : यंदाच्या आयपीएलच्या 11व्या सीझनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार रणवीर सिंग परफॉर्म करणारे. आयपीएलच्या या 15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी रणवीर घेत असलेलं मानधन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. रणवीर या परफॉर्मन्ससाठी 5 कोटी रुपये मानधन घेणारे.आयपीएलच्या आयोजकांनीही रणवीरला एवढी मोठी रक्कम देण्याचं मान्य केलंय. त्यामुळे रणवीरच्या या महागड्या परफॉर्मन्सची आधीच चर्चा सुरू झालीय.7 एप्रिलपासून आयपीएलची धूम सुरू होतेय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणारेय. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंगजमध्ये क्रिकेट सामना रंगणार आहे.

Trending Now