राफेल नदालला फ्रेंच ओपनचं विक्रमी अकरावं विजेतेपद

फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमनिकला पराभवाची धूळ चारली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat
पॅरिस, 10 जून :  फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमनिकला पराभवाची धूळ चारली आहे. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमचा ६-४, ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला आहे.दोन तास चाललेल्या सामन्यात राफेलनं थिएमला संधीच दिली नाही. राफेलनं या सामन्यातील विजयासह 11 वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला आहे.

Trending Now