पाकिस्तानच्या 'या' खेळाडूने यो यो टेस्टमध्ये विराट कोहलीला टाकले मागे

विराट फिट खेळाडू असला तरी तो सर्वांपेक्षा फिट खेळाडू आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल

नवी दिल्ली, ०४ सप्टेंबर- भारतीय क्रिकेट संघात आता यो- यो टेस्ट पास केल्याशिवाय प्रवेश मिळणं मुश्किलच झालं आहे. आता भारतीयांच्या पावलांवर पाऊल ठेवत पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही यो- यो टेस्ट घेऊन खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया कपसाठी पाकिस्तानचे क्रिकेटर फिट आहेत की नाही हे पडताळून पाहण्यासाठी यो- यो टेस्ट घेण्यात आली.  arysports.tv ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, वेगवान गोलंदाज हसन अली हा सर्वात फिट खेळाडू ठरला आहे. त्याने या टेस्टमध्ये एकूण २० गुण मिळवले.या गुणासोबतच त्याने विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. यो- यो टेस्टमध्ये विराटने १९ गुण कमावले होते. त्यामुळे फिटनेसमध्ये विराटपेक्षा हसन वरचढ ठरला असेच म्हणावे लागेल. याआधी १९.२ गुण मिळवून मनिश पांडे सर्वांत पुढे होता. त्यामुळे विराट फिट खेळाडू असला तरी तो सर्वांपेक्षा फिट खेळाडू आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल.फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नाही तर स्थानिक क्रिकेटमध्येही यो- यो टेस्टकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. इंडिया अंडर- १९ मधील क्रिकेटर मयंक दगर याने या टेस्टमध्ये १९.३ गुण मिळवले आहेत. तर रॉयल चॅलेंजर बँगलोरचा खेळाडू अरुण कार्तिकने या टेस्टमध्ये १९.२ गुण मिळवले होते.

तुम्हाला जर हे गुण जास्त वाटत असतील तर जरा थांबा भारतीय हॉकी संघाटा कर्णधार सरदार सिंगने या टेस्टमध्ये तब्बल २१.४ गुणांची कमाई केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई खेळाचा सरदार सिंग भाग होता. विराटपेक्षा २.४ गुणांनी पुढे राहत सरदारने तो सर्वात फिट खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद (१८.२), शोएब मलिक (१७.८) आणि इतर खेळाडूंनी यो- यो टेस्ट पास केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अजूनपर्यंत आशिया कप २०१८ चा त्यांचा चमू घोषित केला नाही.VIDEO : याला कुणी आवरा रे...

Trending Now