महेंद्र सिंग धोनीसाठी खास ठरतंय २०१८ वर्ष

एकीकडे महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत आहेत. तर दुसरीकडे जाहिरातींच्या क्षेत्रात मात्र अजूनही त्याच्याच नावाची चर्चा

मुंबई, ०२ सप्टेंबर- एकीकडे महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत आहेत. तर दुसरीकडे जाहिरातींच्या क्षेत्रात मात्र अजूनही त्याच्याच नावाची चर्चा सुरू असताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि चैन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीसाठी २०१८ हे वर्ष फार लकी ठरलं असंच म्हणावं लागेल. चैन्नईला पुन्हा एकदा आयपील चॅम्पियन बनवल्यानंतर जर्मनीच्या सायबर सिक्युरिटी कंपनी वॉर्डबिजने धोनीसोबत तीन वर्षांचा एक करार केला आहे. या करारासाठी वॉर्डबिजने धोनीला तब्बल १५ कोटी रुपये दिले आहेत. याआधी धोनीने पुण्यातील इंडिगो पेंट्स कंपनीसोबत तीन वर्षांचा करार केला होता. पण या कंपनीने धोनीला किती मानधन दिले याबद्दल खुलासा झालेला नाही. एवढेच नाही तर त्याने स्पोर्ट्स टेक्नॉलॉजू स्टार्टअपचा मेंटॉर आणि ब्रँड अम्बेसिडर होण्यासाठी कंपनीमध्ये २५ टक्के भागीदारीही घेतली आहे.वॉर्डबिजसह करार केल्यानंतर धोनी म्हणाला की, ‘या कंपनीसोबत काम करण्यासाठी मी फार उत्सुक आहे. ही कंपनी नेहमी खासगी कॉम्प्युटर आणि मोबाइल सिस्टिमच्या संपूर्ण संरक्षणासाठी ‘वन- स्टॉप शॉप’ म्हणून ओळखली जाते. मी माझ्या काही कल्पनाही त्यांना सांगितल्या आहेत’. कॉम्प्युटर आणि मोबाइलच्या सिक्युरिटी सल्युशन प्रोडक्ट तयार करण्याकडे वॉर्डबिज भारतात त्यांचे जाळे पसरवण्याच्या तयारीत लागले आहे.वॉर्डबिज कंपनीचे भारतातले सीईओ अभिजीत खोत यांनी धोनीचे स्वागत करताना म्हटले की, ‘धोनी ज्या पद्धतीने त्याचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी उतावीळ असतो, त्याचपद्धतीने आमची कंपनीही दिलेलं ध्येय गाठण्यासाठी उतावीळ असते. आमच्या प्रवासात आता आम्ही धोनीला सोबत घेतलं आहे, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमचा पुढील प्रवास चांगला होणार.’

'सनातनवर बंदी घातलीच पाहिजे'

Trending Now