...म्हणून वर्ल्‍ड रेकॉर्ड करूनही सचिनसमोर हरला जो रूट

एजबेस्टनमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्याची मालिका खेळली जात आहे. कालपासून या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नवा विक्रम केला आहे. आतापर्यंत जो रूटने कसोटी सामन्यात तब्बल २०५८ दिवसांच्या कालावधीत ६ हजार धावा करत विश्वविक्रम केला आहे. त्याच्या आधी हा रेकॉर्ड एलिस्‍टर कुकच्या नावावर होता. कुकने २१६८ दिवसांत हा रेकॉर्ड केला होता. रूटने १२७ ओव्हर्समध्ये ६ हजार धावा केल्या आहेत. रूटच्या आधी फक्त वॉली हेमण्‍ड, सर लियोनार्ड हटन आणि केन बॅरिंगटन हे खेळाडू आहेत. हेमण्‍डने ११४ तर हटन आणि बैरिंगटनने ११६ षटकात एवढ्या धावा केल्या होत्या.

६ हजार धावा पूर्ण करणारा जो रूट हा जगातला ६५ वा तर इंग्लंडचा १५ वा खेळाडू ठरला. रूटच्या नावावर हा नवा विक्रम नोंदवला गेला असला तरी सचिनच्या पुढे मात्र तो जाऊ शकला नाही.
रूटने एजबेस्‍टननमध्ये अर्धशतक ठोकले. भारताच्या विरोधातले त्याचे हे १२ वे अर्धशतक होते. आतापर्यंत भारत विरूद्ध इंग्लंड खेळण्यात आलेल्या प्रत्येक सामन्यांमध्ये रूटने अर्धशतक ठोकले आहे. त्याने ७० कसोटी मालिकेत १२७ षटकात ५२.१६ च्या रनरेटने ६ हजार धावा केल्या. या दरम्यान त्याने १३ शतक आणि ४० अर्धशतकं ठोकली आहेत.

Trending Now