तीन महिन्यांत ‘या’ ६ खेळाडूंनी केला क्रिकेटला राम-राम

सध्या क्रिकेटमध्ये नव्या खेळाडूंचं वारं वाहताना दिसत आहे. ऋषभ पंत, पृथ्वी शॉ यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसते. त्यांच्या नावावर वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरलेले पाहतो. एकीकडे संघात युवा खेळाडू आपला जम बसवताना दिसत आहेत, तर दुसरीकडे गेल्या तीन महिन्यांत नावाजलेल्या अनुभवी खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. सर्वातआधी भारताचा सर्वोत्कृष्ट फिल्डर आणि फलंदाज मोहम्मद कैफने सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीची बातमी दिली. कैफने १३ जुलैला त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करुन निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर भारताची महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीने २४ जुलैला टी-२० आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली. तिने वयाच्या ३५ व्या वर्षी हा निर्णय घेतला.

भारताचा फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथनेदेखील क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सननेसुद्धा ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय खेळामधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडचा यशस्वी फलंदाज एलिस्टर कुकनेदेखील २ सप्टेंबरला निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. भारताचा जलदगती गोलंदाज आरपी सिंगने एक पत्र लिहून ५ सप्टेंबरला निवृत्ती जाहिर केली.

Trending Now