पंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का

पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि पीटीआयचे प्रमुख इमरान खान १८ ऑगस्टला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. ही शपथ घेण्यापूर्वीच त्याच्यासाठी एक वाईट बातमी आहे. १८ ऑगस्टला साध्या पद्धतीने शपथ वीधी पार पडणार आहे. या समारंभासाठी त्यांनी भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर, कपिल देव आणि नवजोत सिंग सिद्धू यांना आमंत्रण दिले आहे. मात्र, शपथविधीपूर्वी इमरान खानने भारताविरोधात २६ वर्षांपूर्वी केलेला विक्रम मोडला आहे. जलदगती गोलंदाज इमरान खान यांच्या नावे भारताचे सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम होता.

इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने पहिल्या डावात भारताचे पाच गडी बाद करुण हा विक्रम मोडला आहे. अँडरसनने आतापर्यंत ९५ भारतीय खेळाडूंना बाद केले आहे. भारताच्या विरोधात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जलद गोलंदाजाच्या यादीत मॅक्लम मार्शल (७६ गडी), अँडी रॉबर्ट्स (६७ गडी), नेस हॉल, रिचर्ड हॅडली, कोर्टनी वॉल्श आणि डेल स्टेन (प्रत्येकी ६५ गडी) या खेळाडूंची नावं आहेत.

Trending Now