मराठी बातम्या / बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 Tickets: आवडत्या टीमचा सामना प्रत्यक्ष पाहायचाय? मग असं बुक करा IPLचं ऑनलाईन तिकीट

IPL 2023 Tickets: आवडत्या टीमचा सामना प्रत्यक्ष पाहायचाय? मग असं बुक करा IPLचं ऑनलाईन तिकीट

आयपीएलमधील आवडत्या टीमची मॅच बघण्यासाठी ऑनलाइन तिकीट कसं बूक कराल?

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला 31 मार्च पासून सुरु होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानात जाऊन आयपीएल मॅचेस बघायच्या आहेत ते आयपीएलच्या अधिकृत वेबसाइट आणि खाली नमूद केलेल्या इतर वेबसाइटवरून ऑनलाइन तिकीटं खरेदी करू शकतात.


मुंबई, 3० मार्च : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला 31 मार्च पासून सुरु होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि गुजरात टायटन्स (जीटी) यांच्यातील मॅचनं सिझनची सुरुवात होणार आहे. सर्व क्रिकेट चाहते टाटा आयपीएलच्या नवीन सिझनचा आनंद घेण्यासाठी आणि आपल्या आवडच्या खेळाडूंना खेळताना बघण्यास उत्सुक आहेत. क्रिकेट चाहत्यांना पॅव्हेलियनमधून लाइव्ह क्रिकेट बघता यावं यासाठी टाटा आयपीएल 2023 चं ऑनलाइन तिकीट बुकिंग पोर्टल अ‍ॅक्टिव्ह करण्यात आलं आहे. ज्यांना प्रत्यक्ष मैदानात जाऊन आयपीएल मॅचेस बघायच्या आहेत ते आयपीएलच्या अधिकृत वेबसाइट आणि खाली नमूद केलेल्या इतर वेबसाइटवरून ऑनलाइन तिकीटं खरेदी करू शकतात.

या वर्षी भारतातील 10 किंवा अधिक शहरांमध्ये आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. आयपीएल 2023 ची तिकिटं BookMyShow, Insider.in, Ticket Genie, Occasions Now आणि Paytm सारख्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. तिकीट बुकिंग प्रक्रिया अतिशय सुलभ असून चाहत्यांना वर दिलेल्या अ‍ॅप्स आणि साइट्सवरून तिकिटं खरेदी करता येतील. तिकीट बुक करताना चाहते आपल्या आवडीचं सीट निवडू शकतात.

सीटच्या स्थानानुसार तिकिटांच्या किंमती :

ब्लॉक सी1, डी1, एफ1, जी1, एच1, के1- 400 रुपये

ब्लॉक बी1, डी, ई, एफ1,जी, एच, जे, एल1- 500 रुपये

ब्लॉक एफ - 900 रुपये

ब्लॉक सी & के - 1,000 रुपये

ब्लॉक एल - 1,800 रुपये

ब्लॉक बी - 2,100 रुपये

ब्लॉक क्लबहाउस अप्पर - 3,000 रुपये

ब्लॉक क्लबहाउस लोअर - 9,000 रुपये

वरील आयपीएल तिकिटाचे सामान्य दर असून हे दर प्रत्येक सामन्यानुसार वेगळे असू शकतात.

IPL 2023 : आयपीएलचा 'रन'संग्राम होतोय सुरू, पाहा IPLचं संपूर्ण वेळापत्रक, आणि कुठे पाहता येणार सामने?

आयपीएलच्या अधिकृत साईटवरून तिकीट कसं बूक कराल?

- आयपीएल 2023च्या अधिकृत तिकीट बुकिंग पोर्टलवर जा.

- होमपेजवर, बूक किंवा बाय या ऑप्शनवर क्लिक करा.

- तिथे तुम्हाला स्टेडियमनुसार तिकीट बुकिंगचा पर्याय मिळेल.

- तुम्हाला पहायची असलेली मॅच आणि तारीख निवडा.

- तुम्ही निवडलेल्या मॅचसाठीच्या तिकिटाची किंमत स्क्रीनवर दिसेल.

- तिकिटासाठी ऑनलाइन पेमेंट करा.

- पेमेंट केल्यानंतर ऑनलाइन तिकीट डाउनलोड करा.

BookMyShowवरून आयपीएलसाठी तिकीट कसं बूक कराल?

- फोनमध्ये BookMyShow अ‍ॅप इन्स्टॉल करा.

- यशस्वीरित्या अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते उघडा.

- त्यानंतर आयपीएल तिकीट बुकिंग 2023 तिकीट हा ऑप्शन शोधा.

- आयपीएल 2023च्या तिकीटाच्या किंमतींची यादी स्क्रीनवर दिसेल.

- तुम्ही त्यापैकी एक निवडून ‘नेक्स्ट’ या ऑप्शनवर क्लिक करू शकता.

- आता तुम्हाला तिकिटाचे पैसे द्यावे लागतील.

- पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, ऑनलाइन तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

IPL 2023 : आयपीएल 2023 मधील सर्वात हँडसम क्रिकेटर्स, ज्यांनी आपल्या स्टाईलने मैदानातही दाखवला जलवा

Paytm वरून आयपीएलसाठी तिकीट कसं बूक कराल?

- तुमच्या डिव्हाइसवर पेटीएम अ‍ॅप इन्स्टॉल करा आणि ते ओपन करा.

- आयपीएल 2023 तिकीट बुकिंग सेक्शनवर क्लिक करा.

- आता स्क्रीनवर आयपीएल 2023 तिकीट बुक किंवा खरेदीचा ऑप्शन दिसेल.

- सीट सिलेक्ट करून नेक्स्टवर क्लिक करा.

- त्यानंतर पेटीएम वॉलेट किंवा यूपीआयद्वारे पेमेंट करा.

- ऑनलाइन तिकीट डाउनलोड लिंक तुमच्या मोबाइलवर येईल त्यावर क्लिक करून तिकीट डाउनलोड करा.

First published: March 30, 2023, 12:17 IST
top videos
  • Kolhapur News : घरातील शुभकार्याचे निमित्त साधून 'इथं' लावली जातात झाडे, वाढदिवस देखील केला जातो साजरा, Video
  • Pune News : दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनो ॲडमिशनसाठी लगबग सुरू आहे? मग ‘या’ शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायला विसरू नका!
  • Pune News : पुण्याच्या लेकीची NDA मध्ये दमदार एन्ट्री, संपूर्ण देशात आली तिसरी, Video
  • Mumbai News : Rasika Sunil करणार Diet लग्न, मुहूर्तही ठरला! पाहा काय आहे प्रकार Video
  • Chhatrapati Sambhaji Nagar News : 15 वर्षांच्या मुलीने उभारली पुस्तकांसाठी मोठी चळवळ, संपूर्ण शहरात उभारलं नेटवर्क, Video
  • Tags:Cricket, Cricket news, IPL 2023, Mumbai Indians, RCB

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स