इंग्लंडमध्ये तब्बल ६६ वर्षांनी 'हा' भारतीय सलामीवीर झाला यष्टीचीत

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या डावात एक असा प्रकार पाहायला मिळाला आहे जो आत्तापर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये फक्त तिसऱ्यांदा घडला आहे. तब्बल ६६ वर्षांनंतर इंग्लंडच्या मैदानात एक भारतीय सलामीवीर स्टंप आउट झाला आहे. आता या कसोटीत शिखर धवन स्टंप आउट झाला आहे आणि तो भारताचा तिसरा सलामीवीर खेळाडू ठरला आहे.

या आधी १९५२ मध्ये भारताचे सलामीवीर पंकज रॉय स्टंप आउट झाले होते. मुस्ताक अली हे पहिले भारतीय सलामीवीर आहेत जे १९३६मध्ये स्टंप आउट झाले होते.

Trending Now