Asian Games 2018 : 'गो फॉर गोल्ड',हॉकीत भारताने उडवला जपानचा 8-0 ने धुव्वा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने या आधी हाॅगकाॅगचा धुव्वा उडवला होता.

जकार्ता, 24 आॅगस्ट : आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने जपानचा धुव्वा उडवत शानदार विजय मिळवलाय. भारतीय टीमने जपानचा 8-0 ने दारूण पराभव केलाय. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सलग तिसरा विजय आहे. भारताने आतापर्यंत 51 गोल केले आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने या आधी हाॅगकाॅगचा धुव्वा उडवला होता. हाॅगकाॅगला टीम इंडियाने एकही गोल करून दिला नाही. हाॅगकाॅगचा तब्बल 26-0 ने पराभव केला होता. त्याआधी भारताने इंडोनेशियाचा 17-0 ने पराभव केला होता. टीम हॉकीची खेळी इतकी जबरदस्त आहे की आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू दिला नाही. त्यामुळेच हाॅकीसाठी टीम इंडियाकडून गोल्डच्या अपेक्षा वाढल्या आहे.दरम्यान, आज आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने इराणच्या महिला संघाने भारतील महिला संघाचा 27-24 या फरकाने पराभव केलाय. सुवर्णपदकाचे स्वप्न उराशी बाळगूण मैदानात उतरलेल्या महिला टीमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

इराण आणि भारतामध्ये अत्यंत अतीतटीचा सामना रंगला. पण अखेरच्या क्षणात इराणच्या महिला खेळाडूंनी मुसंडी मारत 3 अंकाची आघाडी घेतली आणि विजय मिळवला. भारतीय महिला टीमने केले पर्यंत अपूर ठरले. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.काल इराणच्या पुरुष संघानेच सातवेळी विजयी असलेल्या भारतीय संघाचा पराभव केला होता.दरम्यान, आज भारताचे टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण या जोडीने भारताला पुरूष दुहेरी जोडीने सहावे सुवर्णपदक जिंकवून दिले. भारतीय जोडीने अंतिम सामन्यात कजाकिस्तानच्या एलेक्सांद्र बुबलिक डेनिस येवसेयेव या जोडीला  ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये हरवले.अंतिम सामन्यात चुरशीचा सामना पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात असताना हा सामना पूर्णपणे भारताच्या बाजूनेच राहिला.

Trending Now