आपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट

कलाकारांचे आणि क्रिकेटर्सचे मित्र- मैत्रिणी कोण असतील याबद्दल त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आज आम्ही तुमच्या याच उत्सुकतेचं थोडंसं निरसन करणार आहोत. आज आम्ही तुम्हाला भारतीय खेळाडूंचे जिवलग मित्र कोण आहेत ते सांगणार आहोत. भारताचा धडाकेबाज सलामीवीर ठरलेला विरेंद्र सेहवागची मैत्री संघात सचिन आणि गौतम गंभीरसोबत होती. पण सर्वात जास्त घनिष्ठ मैत्री माजी जलद गोलंदाज आशीष नेहरासोबत आहे. दोघांनी १९९७- ९८ मध्ये क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये दोघं एकत्रच स्कुटीवरून सरावाला जात असतं. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबली ही जोडी तर जगभरात प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का, भारताचा कर्णधार सौरव गांगुली आणि सचिनची फार घनिष्ठ मैत्री आहे. दोघांनी लहान वयातच हातात बॅट घेतली. अनेक सामन्यांसाठी सचिन आणि सौरभ लहानपणी एकत्र प्रवास करायचे. त्यामुळे त्यांची मैत्री ही भारतीय संघात येण्यापूर्वीची आहे. क्रिकेटसोबतच खेळण्याबरोबरच या दोघांनी अनेक एकत्रीत अनेक आनंद लुटले आहेत. १९९२ मध्ये जेव्हा गांगुलीला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते, तेव्हा सचिनने त्याच्या बॅटने फलंदाजी केली होती.

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या मित्रांची लिस्ट खुप मोठी आहे. पण क्रिकेट जगतात युजवेंद्र चहलसोबत चांगली मैत्री आहे. चहल भारतीय संघात लेग स्पिनर आहे. दोघांमधल्या मैत्रीची सुरूवात आयपीएलदरम्यान झाली. दोघेही आरसीबीकडून खेळतात. विराटचा चहलवर प्रचंड विश्वास आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे की, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्यात घट्ट मैत्री आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे या दोघांनी एकत्रित अनेक सामने जिंकले आहेत. कुंबळे एक आक्रमक स्पिनर होता. जेव्हा कुंबळे रागात असायचा तेव्हा सचिन, गांगुलीलादेखील त्याला शांत करु शकत नव्हते. तेव्हा हे काम द्रविडकडे सोपवलं जायचं. कॅप्टन कुल अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यात मोजकेच मित्र आहेत. मोजक्याच लोकांमध्ये रमणं त्याला आवडतं. क्रिकेट जगतात सुरेश रैना हा त्याचा खास मित्र आहे. धोनी आणि रैनाने जवळपास एकाच वेळी भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. धोनीने २००४ मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर एका वर्षाने रैनाचा संघात समावेश झाला. दोघंही मधल्या फळीमध्ये फलंदाजी करतात. तसेच आयपीएलमध्येदेखील हे दोघं चैन्नई सुपर किंग्स या संघाकडून कित्येक वर्ष खेळत आहेत.

Trending Now