महेंद्र सिंग धोनीची ही जबाबदारी कोण उचलणार?

आपण नेहमीच म्हणतो की, जग कोणासाठी थांबत नाही. एखाद्या माणसाची जागा दुसरी व्यक्ती कळत नकळत घेतेच. दिग्गज खेळाडूची जागा नवखा खेळाडू घेतो आणि जीवनचक्र सुरूच राहतं. पण भारतीय क्रिकेट संघात अशी एक जागा आहे ज्याच्यासाठी अजूनही योग्य खेळाडू मिळत नाहीये. तुम्हाला जर सचिन तेंडुलकर किंवा राहुल द्रविडला पर्यायी खेळाडू हवा असेल असं जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही बोलतोय ते भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीबद्दल. धोनीने कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतली आणि त्याची जागा कोण बरून काढणार याचा शोध सुरू झाला. पण एवढ्या वर्षांनंतरही योग्य असं उत्तर बीसीसीआयला मिळालेलं नाही असंच म्हणावं लागेल.

धोनी कर्णधार म्हणून जेवढा यशस्वी होता तेवढाच किंबहूना त्याहून जास्त यशस्वी तो यष्टीरक्षक म्हणून आहे. त्याच्या नावावर अनेक रेकॉर्डही आहेत. कर्णधारपदाची धुरा धोनीनंतर विराट कोहलीकडे आली. मात्र यष्टीरक्षणासाठी अजूनही टीम इंडियाला चांगला खेळाडू मिळत नाहीये. धोनीनंतर भारतीय संघाने पाच यष्टीरक्षकांना आजमावून पाहिले. यामध्ये सर्वात आधी पार्थिव पटेलचं नाव येतं धोनीच्याहीआधी त्याने भारताकडून खेळण्यास सुरुवात केली होती पण त्याच्या खराब खेळीमुळे त्याला संघात जास्त काळ टिकता नाही आलं. त्यानंतर वृद्धीमन सहा, नमन ओझा, दिनेश कार्तिक हे खेळाडू आहेत ज्यांच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र कोणालाच साजेशी कामगिरी करता आली नाही. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंतदेखील काही खास कामगिरी दाखवू शकला नाही. त्यामुळे धोनीला पर्यायी खेळाडू अजून मिळाला नाही असंच म्हणावं लागेल.

Trending Now