किती आहे विराट कोहलीची कमाई आणि बँक बॅलेंस ?

जगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांची ब्रँड व्हॅल्यू सर्वांनाच माहिती आहे. तो जगातील अशा खेळाडूंपैकी एक आहेत ज्याने कमी वयात मोठी मजल मारली आहे. गेल्या 10 वर्षांपासून भारतीय संघात खेळणाऱ्या या उत्तम खेळाडूचा पगार नेमका किती असावा हे जाणून घेण्यात तुम्हालाही उत्सुकता असेलच. त्याच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. आज तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. फिनिएपमध्ये छापलेल्या वृत्तानुसार, विराटच्या मॅच फीपासून ते अनुदानापर्यंतची वार्षिक कमाई ही 121 कोटी रुपये आहे. विराटची एकूण मालमत्ता 390 कोटी रुपये आहे.

प्रत्येक हंगामात आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराट 14 कोटी रक्कम मिळते. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली सर्वात महागडा खेळाडू आहे. विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये 30 लाख, कसोटी सामन्यांत 50 लाख आणि आंतरराष्ट्रीय टी -20साठी 20 लाख रुपये घेतो. विराटच्या मालमत्तेविषयी बोलायचं झालं तर त्याच्याकडे 42 कोटींची संपत्ती आहे. ज्यात दोन घरं आहेत. त्यातलं एक घर दिल्ली आणि दुसरं घर मुंबईच्या वांद्र्याला आहे. 2012मध्ये, त्यांने वांद्रेमध्ये 9 कोटी रुपयांचं अपार्टमेंट विकत घेतलं होतं. या घराच्या इंटेरियरसाठी विराटने 1.5 कोटी रुपये खर्च केले होते. विराटकडे मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यू अशा एकूण 6 कार आहेत. ज्यांची किंमत 9 कोटी रूपये आहे. यातील काही गाड्या त्याला गिफ्ट म्हणूनही मिळाल्या आहेत. या अहवालात आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे तो म्हणजे, विराटच्या बँक खात्यात फक्त 3 कोटी रुपये आहेत.

Trending Now