India vs England: २० वर्षीय खेळाडूने फक्त ८ चेंडूत फिरवला सामना

इंग्लंडची संपूर्ण टीम पहिल्या डावात फक्त २८७ धावा करू शकली. यानंतर भारताच्या शिखर धवन आणि मुरली विजय या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरूवात करुन देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ५० धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या २० वर्षीय खेळाडू सॅम करणने सामन्याचे चित्र पालटवलं.

याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने के.एल. राहुललाही बाद केले. राहुलने फक्त ४ धावा केल्या होत्या. पुढच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शिखर धवनलाही २६ धावांवर माघारी पाठवले. सॅमने केवळ आठ चेंडूत भारताच्या तगड्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Trending Now