India vs England: कबुतरामुळे बाद झाला हा इंग्लंडचा खेळाडू!

अनेकदा मैदानात अशा काही घटना होतात की, क्रिकेटपेक्षा त्या घटनेचीच चर्चा अधिक होते. असंच काहीसं भारत आणि इंग्लंड सामन्यात झाले. नाणेफेक जिंकत इंग्लंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कीटोन जेनिंग्स आणि जो रूट या दोघांनी दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवसाच्या ३६ व्या षटकात मैदानात अचान एक कबूतर आले. मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर जेनिंग्स स्ट्राइक घेण्यासाठी सज्ज झाला होता. पण कबुतर मैदानात आल्यामुळे त्याला दुखापत होऊ नये म्हणून जेनिंग्स त्याला मैदानातून हटवण्याचा प्रयत्न करत होता.

जेनिंग्स आणि रूटच्या प्रयत्नांना फारसं यश आलं नाही. कबुतराला मैदाना बाहेर काढण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते कबुतर मैदानातून हटतच नव्हते. यानंतर जेनिंग्स स्ट्राइक घ्यायल सज्ज झाला आणि शम्मीच्या भेदक गोलंदाजीवर बाद झाला. संपूर्ण सामन्यापेक्षा जेनिंग्सच्या बाद होण्याचीच चर्चा अधिक झाली. यावर जेनिंग्स म्हणाला की, माझ्या चुकीमुळे मी बाद झालो. समोरून येणारा चेंडू कशापद्धतीने खेळायला हवा याचा अंदाज चुकला. माझ्या बाद होण्याचा आणि त्या कबुतराचा काहीही संबंध नाही.

Trending Now