उपकर्णधार अजिंक्य रहाणेला डावलून अनुष्का शर्माला पहिल्या रांगेत जागा

भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य राहणेचा चेहराही या फोटोत नीटसा दिसत नाही

लंडन, ०८ ऑगस्ट- भारतीय क्रिकेट संघ गुरूवारी इंग्लंडविरोधात दुसरा कसोटी सामना खेळायला सज्ज झाला आहे. याआधी भारतीय संघाने लंडन येथल भारतीय हायकमीशनची भेट घेतली. या भेटीनंतर बीसीसीआयने भारतीय हाय-कमीशनसोबत एक फोटो काढला. हा फोटो बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअरही केला. चाहत्यांना हा फोटो आवडेल अशी साऱ्यांची अपेक्षा होती, मात्र झाले नेमकी उलटे. लोकांनी या फोटोला ट्रोल करायला सुरूवात केली. या फोटोमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही दिसली.

Trending Now