भारताच्या विजयात केएल राहुल, कुलदीप यादवचा सिंहाचा वाटा, मालिकेत १-० ने आघाडी

इंग्लंडकडून जोस बटलरने एका बाजूने किल्ला लढवत आपलं अर्धशतक साजरं केलं. मात्र त्याला इतर फलंदाजांची हवीतशी साथ लाभली नाही

Sonali Deshpande
मॅनचेस्टरमध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर एकहाती विजय मिळवला आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला. इंग्लंडकडून भारताला विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. भारताने हे लक्ष्य अवघ्या 18.2 षटकात पूर्ण केले. डावखुऱ्या फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने पहिल्या डावात 5 गडी बाद केले. कुलदीपने 4 षटकात 24 धावा देत, 5 गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात केएल राहुलने अवघ्या 54 चेंडूत 101 धावा केल्या.हेही वाचा: अखेर १२ तासांनंतर पश्चिम रेल्वे रुळावर!इंग्लंडकडून जोस बटलरने एका बाजूने किल्ला लढवत आपलं अर्धशतक साजरं केलं. मात्र त्याला इतर फलंदाजांची हवीतशी साथ लाभली नाही. भारतीय गोलंदाजांना पहिल्या षटकात जेसन रॉय- जोस बटलर जोडीच्या आक्रमक फटकेबाजीचा सामना करावा लागला. मात्र जेसन रॉयला उमेश यादवने आपल्या गोलंदाजीवर माघारी धाडलं. यानंतर इंग्लंडचा एकही फलंदाज कुलदीपच्या गोलंदाजीपुढे तग धरु शकला नाही.

बटलरने 69, जेसन रॉयने 30 तर डेव्हिड विलीने नाबाद 28 धावा केल्या. इंग्लंडने 20 षटकांमध्ये 8 गडी गमावत 159 धावा केल्या. तर दुसरीकडे कुलदीपला उमेश यादवने २ आणि हार्दिक पांड्याने १ बळी घेत चांगली साथ दिली. एकीकडे भारताच्या गोलंदाजांकडून होणारा मारा आणि आक्रमक फलंदाजी पुढे इंग्लंडच्या टीमने नांगी टाकली. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली.हेही वाचा: 47 वर्षांनंतर नागपुरात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन!

Trending Now