PHOTOS : विराटच्या फेव्हरेट खेळाडूच्या जागी या मुंबईकराला दिली पाहिजे संधी

भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने चौथा सामना जिंकून ही मालिका आपल्या खिशात घातलीय. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला हरवल्यानंतर भारत ही मालिका जिंकेल अशी आशा भारतीय प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. पण चौथ्या सामन्यात भारतीय संघातील काही खेळाडूं चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना प्रेक्षकांची नाराजी ओढवून घ्यावी लागली. या कसोटीत भारताचा खेळाडू के.एल राहुलची बॅट काही खास कमाल दाखवू शकली नाही. चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात तो त्याचे खाते न उघडताच परतला होता. त्यामुळं पाचव्या सामन्यात त्याच्या ऐवजी पृथ्वी शॉला संधी देणं योग्य ठरेल.

पृथ्वीने 19 वर्षाखालील विश्वचषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळं इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यानंतर त्याला खेळण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. पण अजून त्याला संधी मिळाली नाही. लंडनमध्ये 7 सप्टेंबरला होणाऱ्या पाचव्या सामन्यात त्याला संधी दिली तर विश्वचषकानंतर त्याच्या फॅन्सना त्याचा अजून एक चांगला परफॉर्मन्स बघायला मिळेल.

Trending Now