Ind vs End-... म्हणून ११ धावांवर २ गडी बाद झाले तरी भारत हरणार नाही हा सामना

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची सुरूवात खराब झाली. भारताने ११ धावांमध्ये दोन गडी गमावले. मुरली विजय पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. त्यानंतर त्याचा जोडीदार केएल राहुलही ८ धावा करुन बाद झाला. भारताच्या खराब प्रदर्शनानंतरही लॉर्डसचा इतिहास सांगतो की, इंग्लंडला हा सामना जिंकण फार कठीण आहे.

लॉर्डस् मध्ये गेल्या १० सामन्यांमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला सातवेळा हार पत्करावी लागली आहे. दोन सामने ड्रॉ झाले आहेत तर एकवेळा २०१२ मध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करत इंग्लंडने भारताला हरवले होते. तर २०१४ मध्ये पहिली गोलंदाजी स्वीकारत भारताना इंग्लंडला हरवले होते.

Trending Now