Ind vs End- खेळण्याची संधी देऊन विराटनेच दिला दगा

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक होती. १५ धावांत भारताचे तीन खेळाडू बाद झाले. पहिला सामना हरल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघात दोन महत्त्वपूर्ण बदल केले. कोहलीने उमेश यादवच्या जागी कुलदीप यादवला संघात घेतले तर शिखर धवनच्या जागी चेतेश्वर पुजाराची वर्णी लागली.

पुजाराने फटका मारल्यानंतर ते दोघे धावा काढण्यासाठी पळाले आणि अचानक कोहलीने पळण्यास नकार दिला. मात्र, तोपर्यंत पुजारा खुप पुढे आला होता. त्यामुळे तो बाद झाला. पहिला सामना हरल्यानंतर भारतीय माजी खेळाडूंनी पुजाराला संघात घेण्याचा सल्ला दिला होता. पण चेतेश्वर कर्णधाराच्या चुकीमुळे साजेशी कामगिरी करू शकला नाही.

Trending Now