पाचव्या कसोटी सामन्यात कोहलीला दोन विक्रम करण्याची ‘विराट’ संधी

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने हरली असली तरी विराट कोहलीकडे पाचव्या कसोटीत आपल्या नावावर अजून एक विक्रम करण्याची संधी त्याला मिळाली आहे.

इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका जरी भारतने हरली असली तरी भारतीय कर्णधार विराट कोहलीला मात्र दोन नवीन विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. १९९० मध्ये इंग्लंडच्या ग्रॅहम गूचने तीन कसोटीत ७५२ धावा करून सर्वाधीक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये विराटने एकूण ५४४ धावा केल्या. त्यामुळे विराटला या सामन्यात सर्वाधीक धावा करून हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

वेस्ट इंडिजचे फलंदाज गॅरी सोबर्स यांनी ५२ वर्षांपूर्वी इंग्लंडच्या मैदानात कर्णधार असताना ७२२ धावा केल्या होत्या. सोबर्स यांच्या या खेळीनंतर इंग्लंडच्या मैदानात कोणत्याही कर्णधाराला आजपर्यंत हा विक्रम मोडता आला नाही. विराटला हा विक्रम मोडण्यासाठी केवळ 178 धावांची गरज आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीत विराट कोहली हा विक्रम मोडतो की नाही याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

Trending Now