पहिल्याच डावात हनुमा विहारी जाऊन बसला 'या' दिग्गजांच्या पंगतीत

फार कमी खेळाडूंना आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यात एखादा विक्रम करण्याची संधी मिळते

भारतीय संघात हनूमा विहारीने कसोटी सामन्यात पदार्पण केलं. त्यानं पहिल्याच डावात अर्धशतकी खेळी केली. फार कमी खेळाडूंना आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यात एखादा विक्रम करण्याची संधी मिळते. हनुमा विहारी हा त्यातलाच एक. विहारीने १२४ चेंडूत ५६ धावा करून भारतीय संघाची दुसऱ्या दिवशीची धुरा एकहाती सांभाळली.

२००१ नंतर आतापर्यंत डेब्यु मॅचमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत हनुमा चौथ्या स्थानावर आहे. २०१३ मध्ये रोहित शर्माने डेब्यु मॅचमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध १७७ धावांची खेळी केली होती. सुरेश रैनाने २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध १२० धावा केल्या. २००१ मध्ये वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०५ धावा केल्या होत्या.

Trending Now