Asian Games 2018: गोळाफेकमध्ये 'सिंग इज किंग', तेजिंदरपाल सिंगने पटकावले सुवर्णपदक

जकार्ता, 25 आॅगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकमध्ये तेजिंदरपाल सिंगने भारताला सातवे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. गोळाफेक स्पर्धेत भारताची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सातव्या दिवशी भारतासाठी कही खुशी कही गम असाच होता. पण संध्याकाळी तेजिंदरपाल सिंगनं गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून दिले. तेजिंदरपाल सिंग 19.96 मिटरसह आघाडीवर होता. त्याने शेवटपर्यंतही आघाडी कायम ठेवली आणि अखेर सुवर्णपदक पटकावले. भारताचे हे सातवे सुवर्णपदक आहे. याआधी रोहन बोपण्णा- दिवीज शरण जोडीने सुवर्णपदक मिळवून दिले. रोइंग टीम, कोल्हापूरची कन्या राही सरनोबत,सौरभ चौधरी विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

VIDEO : 'डब्बू अंकल' इज बॅक, मिथुनच्या गाण्यावर तुफान डान्स

Trending Now