ने'मार' खेळीने ब्राझिलची क्वार्टर फायनलमध्ये धडक, मेक्सिको बाहेर

नेमारने या सामन्यात एक गोल केला तर दुसऱ्या गोलसाठी मदत केली.

Sachin Salve
रशिया, 02 जुलै : स्टार खेळाडू नेमारच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर पाच वेळा विजेत्या ब्राझिलने मेक्सिकोला 2-0 ने पराभूत केलं. मेक्सिकोला पराभव करत ब्राझिलने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. मेक्सिको सलग सातव्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम-16 मधून बाहेर पडलीये. तर ब्राझिलने सलग सातव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय.आजच्या सामन्याच्या आधी दोन्ही टीमध्ये झालेल्या पाच सामन्यात ब्राझिलने 13 गोल केले तर मेक्सिकोने फक्त एकच गोल केला. नेमारने या सामन्यात एक गोल केला तर दुसऱ्या गोलसाठी मदत केली.पहिल्या हाफमध्ये ब्राझिलने आक्रमक खेळी केली तर मेक्सिकोनेही कडवी टक्कर दिली. पाचव्या मिनिटाला नेमारने बाॅक्सजवळून गोल करण्याचा प्रयत्न केला पण मेक्सिकोच्या गोलकिपरने तो आडवला. नेमारने तीन वेळा प्रयत्न केला पण गोल करू शकला नाही. अखेर दुसऱ्या हाफमध्ये 51 व्या मिनिटाला नेमारने कोणतीही चूक न करता गोल केला. नेमारचा या वर्ल्डकपमधला हा दुसरा गोल आहे. 68 मिनिटाला ब्राझिलने 2-0 ने आघाडी घेतली.

हेही वाचाहोता वसीम म्हणून वाचले 5 हिंदू बांधव! हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर लाज कशी वाटत नाही?, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप  'काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Trending Now