चौघांच्या फक्त 435 धावा!,इंग्लंडचं कांगारूंना तब्बल 482 धावांचं टार्गेट

Sachin Salve
19 जून : आॅस्ट्रेलियाच्या विरोधात ट्रेंट ब्रिजमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात इंग्लंडने इतिहास रचलाय. इंग्लंडने पहिले फलंदाजी करत तब्बल 481 धावांचा डोंगर रचून नवा विक्रम केलाय.इंग्लंडने एकदिवशी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक असलेल्या 444 धावांचा विक्रम मोडीत काढलाय. इंग्लंडने आॅस्ट्रेलियाच्या विरुद्ध 50 षटकात 481 धावांचा डोंगर उभा केलाय.इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने सर्वाधिक 147 धावा कुटल्यात. तर जॉनी बेयरस्टोने 139 धावांची तुफानी शतकी खेळी केली.  तर ओपनर बेयरस्टोने 82 आणि कर्णधार ऑयन मॉर्गनने 67 धावा केल्यात.

आॅस्ट्रेलियन टीमकडून टायने 9 षटकात तब्बल 100 धावा दिल्यात तर जाय रिचर्डसनने 3 गडी बाद करण्यासाठी 92 धावा द्यावा लागल्यात. तर मार्कस स्टोयनिसने 85 धावा दिल्यात.

Trending Now