'ओडीआय'मध्ये धोनीचा मोठा पराक्रम; ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव!

कॅप्टन कुल या नावाने ओळखला जाणाऱ्या धोनीने एक नवीन रेकॉर्ड बनवलाय. त्याने त्याच्या 'ओडीआय' करिअरमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत.

मुंबई, १५ जुलै : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेट विश्वात अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. कॅप्टन कुल या नावाने ओळखला जाणाऱ्या धोनीने एक नवीन रेकॉर्ड बनवलाय. त्याने त्याच्या 'ओडीआय' करिअरमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत. सध्या भारत आणि इंग्लंडची एक दिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेलतील दुसऱ्या सामन्यादरम्यान धोनीने हा विक्रम केलाय. ओडीआयमध्ये १०,००० रन्स पूर्ण करणारा तो भारतातील चौथा आणि जगातील बारावा खेळाडू ठरलाय.कोल्हापुरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकडगोवेकरांचं आणि क्रोशियाचं हे कनेक्शन तुम्हाला माहित आहे का?

भारत आणि इंग्लंडमधे सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. पण यातही एक आनंदाची बातमी म्हणजे, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्या 'ओडीआय' करिअरमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्यांनतर ट्विटरच्या माध्यमातून सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. यामध्ये ओडीआयमध्ये सर्वांत पहिला १०,००० रन्सचा पल्ला गाठणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही ट्विट करून धोनीला शुभेच्छा दिल्या. धोनीने हा १० हजारचा पल्ला गाठल्याने त्याचे नाव ऍडम गिलख्रिस्ट, मार्क बौचर यांच्या यादीत नोंद झाली आहे.मराठवाडा दौऱ्यातून होणार नव्या ठाकरेंची एण्ट्री; मनसेचा असेल हा मास्टर प्लॅन

PHOTOS : लाॅर्डसवर धोनी-विराटसमोर गर्लफ्रेंडला केलं 

भारतीय खेळाडूंसोबत आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी देखील धोनीचं कौतुक केलंय. यामध्ये 'ओडीआय'मध्ये १० हजार रन्स केलेला अजून एका खेळाडूने त्याचे अभिनंदन केले. तो म्हणजे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा. या बरोबरच क्रिकेट जगातील आजी माजी खेळाडू डेव्हिड व्हॉर्नर, वीरेंद्र सेहवाग आदी नामवंतांनीही ट्विटरच्या माध्यमातून त्याचं अभनंदन केलंय.नुकसान सहन करून गोकुळचे संकलन उद्या बंदVIDEO : जेव्हा रणबीर आलियाला लिफ्ट आॅफर करतो...  

Trending Now