आहे फक्त एकच हात पण लगावतो जबरदस्त षटकार !

अपंगत्वावर मात करत यशाची शिखरं गाठणारे अनेक रोल मॉडेल आपण पाहिले आहेत. आज अशात एका अफलातून व्यक्तीची ओळख आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याला एक हात नाही आहे. पण तरीही क्रिकेट श्रेत्रात त्याची एक वेगळीच ओळख आहे. एक हात नसल्याने फक्त एका हाताने खेळून तो आता धमाकेदार षटकार लगावतो. लहानापणापासून अंपग असल्याने खचून न जाता आपली आवड जोपासत त्याने क्रिकेट खेळायला सुरूवात केली.

आपल्या आवडीलाचं आपलं करिअर बनवत आज तो त्याच्या एका हाताने उत्तम षटकार ठोकवतो. बरं इतकंच नाही तर तो आज इंग्लंडच्या डिसएबल टीमचा उत्तम खेळाडू आहे. या प्रेरणादायी क्रिकेटरचं नाव आहे 'मॅट अस्किन'. त्याने त्याच्या उत्तम खेळीने देशाला अनेत सामने जिंकून दिले आहे. इंग्लंड क्रिकेटच्या अधिकृत ट्विवरवरून मॅकच्या आयुष्यावर आधारित व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Trending Now