अरबाजचा खळबळजनक खुलासा, बॉलिवूडचा मोठा निर्माताही लावतो सट्टा

बुकी सोनू जालानकडे बॉलिवूडचा मोठा निर्माता पराग सांघवीही सट्टा लावायचा, अशी खळबळजनक माहिती अरबाज खानच्या चौकशीतून समोर आली आहे.

Renuka Dhaybar
ठाणे, ता. 02 जून : बुकी सोनू जालानकडे बॉलिवूडचा मोठा निर्माता पराग सांघवीही सट्टा लावायचा, अशी खळबळजनक माहिती अरबाज खानच्या चौकशीतून समोर आली आहे. पराग सांघवीनी निर्मिती केलेले नुकतेच 2 मोठे चित्रपट रिलीज झाले. लवकरच सांघवीलाही ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधी पथक चौकशीला बोलावणार आहे.दरम्यान, या पथकाकडून अरबाज खानची चौकशी आज सकाळी 11 पासून सुरू आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. चौकशीमध्ये बुकी सोनू जालान आणि अरबाझला समोरासमोर बसवण्यात आलं होतं.कोण आहे सोनू जालान ?

- 42 वर्षांचा बुकी, देशात आणि देशाबाहेर सट्टाबाजार चालवतो- यंदाच्या आयपीएलमध्ये सोनू जालाननं 10 कोटी नफा कमावला- सोनूचे अरबाज खानसोबतचे फोटो पोलिसांना सापडले- अरबाज खाननं सोनूच्या मार्फत आयपीएलमध्ये सट्टा लावल्याची माहिती- अरबाज खान लाखो रुपये बेटिंगमध्ये हरला होता- सोनूच्या यादीत अनेक अभिनेते, अभिनेत्री, उद्योगपतींची नावं असल्याचा संशय- सोनू काही आयपीएल खेळाडू आणि निवृत्त खेळाडूंच्या संपर्कात होता- 2008 मध्ये पहिल्यांदा सोनू जालानला अटक

Trending Now