विराट कोहलीला चौथ्यांदा मिळणार बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार

बीसीसीआयद्वारा 12 जूनला बंगळूरूमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात विराट कोहलीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Renuka Dhaybar
मुंबई, ता. 07 जून : गेल्या दोन हंगामांमध्ये शानदार खेळीसाठी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली यांला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा 'पॉली उमरीगर' पुरस्कार जाहीर झाला आहे. बीसीसीआयद्वारा 12 जूनला बंगळूरूमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात विराट कोहलीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.बीसीसीआयचा हा सर्वात मोठा पुरस्कार कोहलीने याआधी 3 वेळा पटकावला आहे. याआधी 2011-12, 2014-15 आणि 2015-16 या साली त्याने हा पुरस्कार मिळवला आहे.बीसीसीआयच्या या पुरस्कार सोहळ्याला घरगुती व आंतरराष्ट्रीय पातळीवर शानदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित केलं जातं. या कार्यक्रमात पुरुष वर्गात कोहलीला सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला जाईल, तर महिला वर्गात हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाला 2016-17 आणि 2017-18 मध्ये उत्कृष्ट खेळण्यासाठी सन्मानित केलं जाणार आहे.

Trending Now