विराट कोहलीच्या नाही आता हिटमॅनच्या नावे आहे हा मोठा पराक्रम

भारतीय टीमचा हिटमॅन रोहित शर्माने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. फोटो सौजन्य - BCCI या सामन्यात रोहितने 137 नाबाद धावा आठ गडी राखून इंग्लंड पराभूत करत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने 181 एकदिवसीय सामन्यात हे 18वं शतकं झळकवलं आहे.

या तुफान खेळमुळे रोहित शर्मा सलग 7 मालिकावीर शतक झळकाविणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. सगळ्यात आधी हा किताब टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे होता. त्याने 2011 आणि 2012 च्या दरम्यान सलग 6 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शतकं पटकावलं होतं. पण आपल्या वादळी खेळीने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडत शतकाचा किताब स्वत:च्या नावे केला आहे.

Trending Now