भारतीय टीममध्ये मोठा बदल, मुंबईच्या पृथ्वी शॉची टीममध्ये एन्ट्री

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विजय मिळविल्यानंतर टीम इंडियाने चौथ्या आणि पाचव्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे.

मुंबई, 22 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विजय मिळविल्यानंतर टीम इंडियाने चौथ्या आणि पाचव्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. यात टीम इंडियाने दोन मोठे बदल केले आहेत. सलामीवीर फलंदाज मुरली विजय आणि चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव यांना संघातून वगळण्यात आले आहे. या दोन खेळाडूंच्याऐवजी, पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी हे नवे युवा इंग्लंडला जाणार आहेत.पृथ्वी शॉने त्याच्या 14 प्रथम श्रेणी सामन्यात आतापर्यंत 56.72 च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 7 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकवली आहेत. अवघ्या 18 वर्षाच्या या फलंदाजाने बंगळूरमध्ये दक्षिण आफ्रिकेतील ए-विरुद्ध शानदार शतक झळकवले आहे. तर अलीकडेच, इंग्लंड दौऱ्यावर पृथ्वी शॉने तीन शतके झळकवली होती.पुरातील लोकांना वाचवण्यासाठी पाठीची केली पायरी, आता हे बक्षिस जाहीर

आंध्र प्रदेशचा स्टायलिश फलंदाज हनुमा विहारीदेखील टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं आहे . त्याने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये 63  सामन्यांत 59.79 च्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत. भारत 'ए' संघातर्फे खेळताना त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शतक झळकावले आहे. त्याने त्याच्या दमदार खेळीने इंग्लंडमध्ये शतक ठोकले आहे. तर , मेयंक अग्रवाल याला पुन्हा एकदा टीममध्ये जागा न मिळाल्यामुळे त्याने यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.भारतीय संघ :विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहणे (उप-कर्णधार), शिखर धवन,  लोकेश राहुल,  चेतेश्वर पुजारा,   करुण नायर,  दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक),  आर. अश्विन,  रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या,  इशांत शर्मा,  मोहम्मद शमी, उमेश यादव, जसमीत बुमराह, शार्दुल ठाकुर, पृथ्वी शॉ,  हनुमा विहारी 'ROADIES' विजेती श्वेताच्या बोल्ड फोटोजमुळे सोशल मीडियावर राडा

Trending Now