England-India Test : विराटला गांगुलीनं दिला हा 'शेवटचा' सल्ला

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताची कामगिरी आतापर्यंत तरी काही खास झालेली नाही. आत्तापर्यंत झालेल्या 4 सामन्यांपैकी भारताला 3 सामन्यांमध्ये हार पत्करावी लागली आहे. आज सुरू होणाऱ्या पाचव्या सामन्यासाठी सौरव गांगुलीने विराटला काही मोलाचे सल्ले दिलेत. काय आहेत ते?

  इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतानं आत्तापर्यंततरी फार काही चांगली कामगिरी केलेली नाही. 4 पैकी ३ सामन्यांमध्ये भारताला हार पत्करावी लागली आहे. आता आज लंडनमध्ये सुरू झालेल्या शेवटच्या सामन्यासाठी विराटसेनेला मार्गदर्शन करायला धावून आलेत दादा- अर्थात सौरव गांगुली. 

या मालिकेसाठी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट सेनेला चांगलं मार्गदर्शन केलं आहे. आज होणाऱ्या शेवटच्या सामन्यावेळी देखील सौरवनं विराटला काही सल्ले दिले आहेत. काय आहे त्यातला महत्त्वाचा सल्ला? भारतासाठी अंडर 19 विश्व चषकात शानदान कामगिरी करणारा पृथ्वी शॉला या शेवटच्या सामन्यात खेळण्याची संधी दिली पाहिजे, असा मोलाचा सल्ला सौरवने विराटला दिला होता. पण अजूनही पृथ्वीला ही संधी मिळालेली नाही.  सौरव गांगुलीच्या मते, भारत ‘अ’ संघात मिडल ऑर्डरमध्ये खेळणारा हनुमा विहारी याला देखील प्लेइंग 11मध्ये खेळायला मिळावं. हा सल्ला मात्र विराटने मनावर घेतलेला दिसतोय. कारण हनुमा आता पाचव्या सामन्यात खेळताना दिसतोय. इंग्लंडचा मोइन अली फलंदाज असून देखील या कसोटीत त्याने उत्तम गोलंदीजी केली आहे. पण भारताचा स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मात्र काही खास कामगिरी दाखवता आली नसल्याने सौरवने त्याच्यावर टीका केली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून अश्विनकडून अपेक्षा होती.   विराट कोहलीसाठी हा पाचवा सामना मानहानीतून वाचण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे विराट आर्मी जीव तोडून खेळणार हे नक्की. सौरवनं दिलेल्या सल्ल्यांचा त्याला किती उपयोग होतो, हे कळेलच!

Trending Now