अखेर अंडर 19 टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड

Sachin Salve
बंगळुरू, 07 जून : मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी अंडर-19 टीममध्ये निवड झालीये.अर्जुन पहिल्यांदाच अंडर-19 टीममध्ये सामिल झालाय.  टीम इंडिया लंकेच्या दौऱ्यावर कसोटी आणि पाच एकदिवशीय सामने खेळणार आहे.अर्जुन तेंडुलकर जलद गोलंदाज आहे आणि उत्तम मध्यम फळीत फलंदाजीही करतो. बंगळुरूमध्ये गुरुवारी भारत अंडर 19 टीमची घोषणा करण्यात आली. अनुज रावत आणि आर्यन जुयाल यांनी याची घोषणा केली.

अर्जुनच्या निवडीवर सचिन तेंडुलकरने आनंद व्यक्त केलाय.

Trending Now