VIDEO : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केली 'रॉयल' एंट्री

आशियाई क्रीडा स्पर्धेत आशिया खंडातील ४५ देश त्यात सहभागी झाले असून, भारताचे 572 खेळाडू सहभागी झाले आहेत.

कार्ता, 18 ऑगस्ट : शनिवारी रात्री १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्याला सुरूवात झाली. आशियाई क्रीडा स्पर्धेत आशिया खंडातील ४५ देश त्यात सहभागी झाले आहेत. भारताचे 572 खेळाडू सहभागी झाले असून, ते 36 विविध खेळांमध्ये आपली कामगिरी दाखविणार आहेत. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे गिलोर बंग कार्नो स्टेडियमवर स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ होताच भारतीय खेळाडूंनी एका वेगळ्या अंदाजात स्टेडियमवर एन्ट्री केली. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी चित्तवेधक आतशबाजी करण्यात आली. या स्पर्धेकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.हा दिमाखदार सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरु झाला. स्टेडियमवर एक भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. ज्याची १२० मीटर लांबी, ३० मीटर रूंदी आणि २६ मीटर उंचीचा मंच एका भव्य पर्वताच्या प्रतिकृतीत उभारण्यात आला आहे. सुप्रसिद्ध इंडोनेशियन नृत्यदिगदर्शक डेन्नी मलिक व एको सुप्रियांटो यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४ हजार नर्तकांनी आपली कला सादर करीत आहेत. 

The stars have arrived! ⭐Bhartiya athletes hai taiyyar, #AsianGames2018 mein medals laana hai laksh iss baar! 👊🔁 RT if this moment gave you goosebumps. #SPNSports #Inauguration pic.twitter.com/koy8dTHlAd

— SPN- Sports (@SPNSportsIndia) August 18, 2018त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध इंडोनेशियन संगीतकार एडी एमस रोनाल्ड स्टीव्हन हे आपल्या शंभरपेक्षाही जास्त वाद्यवृंदच्या तालावर उत्साही आणि रोमांचक सादरीकरण केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला पॉप गायक आंगुंग च्या प्रदर्शनाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यावेळी स्पर्धेत सहभागी ४५ देशांच्या संघाची परेड सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. भारतीय संघाने एका वेगळ्या अंदाजात स्टेडियमवर प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताच्या संघाचे नेतृत्व भालाफेकपटू नीरज चोप्रा याने केले. 4 हजार डांसर या स्टेडियमवर आपली कला सादर करीत आहेत. बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी संघावर नजर...भारताच्या ट्रॅक व फिल्डच्या खेळाडूंनी आशिया स्पर्धेच्या इतिहासात शानदार खेळ केला आहे. त्यात ७४ सुवर्णपदके मिळवली आहेत. बॅडमिंटन कोर्टवर सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू यांचे कडवे आव्हान आहे. के. श्रीकांत आणि एच.एस. प्रणय यांच्यामुळे भारताला आणखी पदके मिळण्याची शक्यता आहे. कुस्तीत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकासह २०२० ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याकरता खेळेल. त्याचवेळी महिला संघ गत स्पर्धेतील कांस्यपदकाचा रंग बदलण्यास उत्सुक आहे. भारताचे लक्ष सर्वोत्तम खेळावरराष्ट्रकुल स्पर्धेतील चांगल्या कामगिरीनंतर भारतीय संघाचे लक्ष्य आता आशियाई स्पर्धेत चांगला खेळ करण्याकडे आहे. येथे पोहचण्यात संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतरही सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याबाबत संघात उत्साह आहे. आशियाई स्पर्धेची तयारी संघासाठी तणावपूर्ण राहिली. त्यात निवडीबाबत तक्रारी आणि न्यायालयीन कारवाई सोबतच नेहमीप्रमाणे पथकाच्या ८०४ सदस्यसंख्येबाबतही वाद निर्माण झाला होता. तसेच, पथकासोबत असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.मात्र भारतीय खेळाडू आता फक्त आपल्या खेळावरच लक्ष देत आहेत. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकांच्या बाबतीत दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन केले. मात्र जास्तीत जास्त खेळाडू आणि प्रशिक्षकांनी मान्य केले की, आशियाई स्पर्धेत चीन, जापान, कोरिया या सारख्या देशांच्या उपस्थितीने आव्हान आणखी कडवे होते. मात्र त्यामुळे उत्साह कमी झालेला नाही.भारताने २०१४ आशियाडमध्ये पदकांच्या संख्येच्याबाबतीत आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली होती. भारताने त्यात ११ सुवर्ण पदकांसह ५७ पदक मिळवले होते. संभाव्य पदकविजेत्यांमध्ये नेमबाजीत मनु भाकर, कुस्तीत सुशील कुमार, भालाफेकीत नीरज चोप्रा आघाडीवर आहेत. या पथकात हिमा दास हिचा समावेश आहे. २० वर्षांखालील विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण विजेती धावपटू असलेल्या हिमाकडून भारताला विशेष आशा आहे. 

Trending Now