विराटच्या आधी हे 6 भारतीय खेळाडूं होते नंबर 1 फलंदाज

एजबेस्टनमध्ये सुरू असलेल्या भारत- इंग्लंडच्या 5 कसोटी सामन्यात विराट कोहली पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मितला मागे टाकत हा विक्रम केला आहे. Photo- PTI यासाठी विराटला तब्बल ३२ महिने वाट पाहावी लागली आहे. हा विक्रम करणारा कोहली सातवा भारतीय खेळडू ठरला आहे. याआधी सहा भारतीय खेळाडूंनी आयसीसी कसोटी यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयसीसी कसोटी यादीत प्रथम क्रमांकाचा फलंदाज हा किताब २०११ मध्ये सचिन तेंडुलकरने पटकावला होता. सचिनने निवृत्ती घेण्याआधी हा विक्रम आपल्या नावे केला होता. Photo- PTI

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने त्याच्या कारकीर्दीत अनेक विक्रम बनवले होते. त्याने 2004मध्ये कसोटी सामन्यात 3 शतक ठोकले होते. आणि 2010मध्ये त्याला आयसीसी कसोटी यादीत प्रथम क्रमांकाचा फलंदाजचा किताबदेखील मिळाला होता. भारतीय माजी सलामीवीर गौतम गंभीर याला आता जरी भारतीय संघात जागा मिळाली नसली तरी मागच्या अनेत सामन्यात त्याची कामगिरी उत्तम होती. त्याने 2009मध्ये आयसीसी कसोटी यादीत प्रथम क्रमांकाचा फलंदाज हा किताब मिळवला होता. (Photo-PTI) भारतीय क्रिकेटमध्ये द वॉल या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू म्हणजे राहूल द्रविड. 2005मध्ये द्रविड कसोटी यादीत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. असं म्हंटलं जातयं की द्रविडने सर्वात जास्त काळ हे पद आपल्याकडे ठेवलं होतं. 80च्या दशकातील प्रसिद्ध खेळाडू म्हणजे दिलीप वेंगसरकर. त्या काळात त्याना अप्रतिम फलंदाज म्हणुन ओळखले जात होतं. त्याला 1988 मध्ये आयसीसी कसोटी यादीत प्रथम क्रमांकाचा फलंदाजचा किताब मिळवला होता. लिटिल मास्टर या नावाने प्रसिद्ध असलेले भारताचे पुर्व खेळाडू सुनिल गावसकर या कसोटीत प्रथम क्रमांक पटकावणारा पहिला फलंदाज आहे. 1979मध्ये त्याने आयसीसी कसोटीत प्रथम क्रमांक मिळवला होता.

Trending Now